
पेठवडगांव/ (सुशांत दबडे)- दिनांक १२ रोजी पहाटे पाऊणे सहाच्या दरम्यान वडगांव-आष्टा मार्गावर भादोले जवळील म्हसोबा फाटा येथे अज्ञात वाहनाची मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या दोन पादचाऱ्यांना ठोकर. यामध्ये दिलीप विठ्ठल पाटील (वय ५७ रा.भादोले) व मालन बाळू वडार (वय ७०रा. कुरळूप) हे दोघे जागीच ठार झाले.
अधिक माहिती अशी, भादोले येथील हनुमान यात्रेसाठी मालन वडार हया कुरळूप मधून माहेरी आल्या होत्या. तसेच दिलीप पाटील हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी गेले असता, आष्ट्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेला अज्ञात वाहनाने मालन वडार व दिलीप पाटील यांना म्हसोबा फाटा येथे मागून जोरदार धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघे जागीच ठार झाले.
या घटनेची खबर मिळताच वडगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळी भादोले गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दोघाचे मृतदेह भादोले प्राथमिक आरोग्य केंद्रात शविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मयत दिलीप पाटील हे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्यात चीफ इंजिनीयर म्हणून काम करीत होते. अधिक तपास गिरीश शिंदे हे करीत आहेत.
