
‘कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 23 एप्रिलला होत आहे.महाडिक व पाटील गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.छाननी प्रक्रियेत विरोधी पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले.या निर्णयाला पाटील गटाने न्यायालयीन आव्हान दिले होते.या अपात्र अर्जावर साखर सहसंचालकांकडून निर्णय होऊन 29 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले.
आता उच्च न्यायालयाकडूनही हे उमेदवार अपात्रच ठरवण्यात आले आहेत.यामुळे सतेज पाटील गटाला जोराचा झटका बसला आहे.आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता.148 पैकी 104 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 44 उमेदवारांमध्ये राजाराम कारखान्यासाठी लढत होणार हे निश्चित झाले आहे. आता या बहुचर्चित कारखाना निवडणुकीत 44 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
