
गारगोटी :भुदरगड तालुक्यातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींनी मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला असून याबाबत विरोधी आघाडीच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत कोणतीही चौकशी सदर भ्रष्टाचाराची चौकशी करणेसाठी विरोधी आघाडीच्या सदस्यांसह ग्रामस्थ शुक्रवार दि.14 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10 वाजता तसहील कार्यालय, भुदरगड समोर उपोषण करणार असल्याचे निवेदन तसहीलदार अश्विनी आडसूळ यांना दिलेले आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, गारगोटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सत्ताधारी मंडळींनी विद्यमान ग्रामपंचायत गारगोटीच्या सत्ताधारी मंडळींनी चुकीच्या पध्दतीने कामकाज केले असून यामुळे गारगोटी शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे गावातील अनेक मुख्य प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. गारगोटी शहराच्या विकासासाठी 15 वा वित्त आयोग, स्वनिधी यासह विविध फंडातून विकासकामांकरीता मंजूर झालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच ग्रामपंचातीचे बोगस बँक खाते उघडून त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. यामुळे विद्यमान सत्ताधारी मंडळीच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणेसाठी आम्ही विरोधी सदस्यांनी व ग्रामस्थांनी वारंवार मागणी करून देखील संबंधितांवर कारवाई झालेली नाही. यामुळे सदर भ्रष्टाचाराची चौकशी होवून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याकरीता शुक्रवार दि.14 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता तहसील कार्यालय, भुदरगड समोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, रणधिर शिंदे, सुशांत सुर्यवंशी, सदस्या अनिता गायकवाड, स्मिता चौगले, माजी उपसरपंच अरुण शिंदे, अल्ताफ बागवान, छाया सारंग, सरिता चिले, महेश सुतार, रुपाली राऊत, दिपक मोरे आदींच्या सह्या आहेत.
