बालिंगे येथे निराधर मुस्लिम कुटुंबास मदत

बालिंगा: बालिंगा हे शाहू महाराज यांनी वसविलेले गांव आहे, त्या मुळे शाहुंच्या विचाराने प्रेरित होऊन धर्म जात पंथ न पहाता येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव,ग्रामपंचायत सदस्य धनंजय ढेंगे..कृष्णात माळी,प्रकाश जांभळे यांच्या पुढाकाराने माळवाडी बालिंगे येथे एक मुस्लिम विधवा, निराधार महिला कुटुंबाचा गाडा‌ओढत आहे.

निगार नवाज तहसीलदार असे त्या कुटुंबाचे नांव आहे. रमजान ईदच्या निमित्ताने त्या कुटुंबासाठी… शीरखुर्मा साठी लागणारे मसाल्याचे पदार्थ , तांदूळ तर उदर निर्वाह साठी संसार उपयोगी साहित्य तसेच त्या विधवा महिलेच्या मुलासाठी कपडे अशा पद्धतीची मदत करून या युवकांनी एक नवीन आदर्श बालिंगे गावासाठी घडवून दिला.या कार्यक्रमासाठी उपस्थित सचिन बुडके, राजेंद्र चौगुले, अजय वाडकर, संदीप ढेंगे, अजिंक्य कोरे ,सचिन कारंडे, विलास वागवेकर ,मोहन कांबळे, मयूर माळी, पिंटू घोडके, तसेच भागातील तरुण उपस्थित होते.

🤙 8080365706