
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?
मेष कलाक्षेत्र प्रसाशकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. आपलं कर्तुत्व अर्थात स्वतःला सिद्ध कराल. अधिकार प्राप्त होतील. प्रेमीयुगुलासाठी उत्तम दिवस आहे. पत्नीकडून सहकार्य कुटुंबातील वरिष्ठ सदस्याकडून प्रशंसा मिळेल.
वृषभ काही घटनामुळे आपल्याला आज मनस्ताप सहन करावा लागणार आहे. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा. नोकरीत दुसऱ्यांवर रोष करू नका. स्थित्यंतर होण्याची संभावना आहे. व्यवसाय रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे.
मिथुन आज आपण टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. व्यवसायिक विस्ताराच्या दृष्टीने योजना पूर्ण होतील. जनसंपर्क वाढल्याने आपली कामे सुरुळीत पूर्ण होतील. व्यवसायिक स्पर्धेत यशाची संधी आज आहे. दाम्पत्य जीवन सुखी राहील. नोकरीत नवीन योजनेचा प्रारंभ करा. सामाजिक मानसन्मान वाढेल.
कर्क आपण केलेल्या कामाची समाधानकारक पोचपावती मिळेल. कलाकारांना नवीन संधी मिळेल. नोकरीत बदल अथवा मोठ्या पदावर बढ़ती मिळेल. कौटुंबिक सहकार्य लाभेल. धन आणि कर्तुत्वं याचा सुवर्णसंगम साधता येईल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत.
सिंह आपले धैर्य कुंटुंबात व समाजात मानसन्मान मिळवून देणार आहे. छोट्या बाबींकडे लक्ष दया. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून फायदा मिळण्याची शक्यता आहे. भौतिक वादाकडे ओढा राहिल.
कन्या बोलण्यातील टीकात्मक वृत्ती टाळा. गैरसमज निर्माण होतील. दिवस धावपळीचा राहील. मानसिक गोंधळ उडालेला असेल. नोकरीत एका योग्य समूहाशी आपला संबंध जुळण्याचा योग आहे. सर्वांच्या बोलण्याला महत्व दया.
तूळ शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी दिवस फायदेशीर आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. राजकारणात पदप्राप्ती प्रतिष्ठा वाढेलं. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासातील प्रगती पाहुन मन समाधानी होतील. लाभदायक दिवस असून नोकरी व्यापारात आर्थिकदृष्या रखडलेली कामे आज मार्गी लागतील. प्रवासातुन लाभ होईल.
वृश्चिक नविन व्यापार सुरु करण्यासाठी उत्तम दिवस आहे. मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पद प्रतिष्ठेत वाढ होईल.भावनांवर नियंत्रण ठेवा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. भौतिक सुख समाधनी दिवस आहे.
धनु नोकरीन नवीन योजना फायदेशीर राहतील. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. काही नवीन भागीदार प्रस्थापित कराल. प्रिय व्यक्तीची भेट होतील. कोर्टकचेरी कायदयाचे वाद असतील तर ते मिटतील. त्यामधून आर्थिक फायदा होईल.
मकर कौटुंबिक पातळीवर संततीविषयी मन चिंताग्रस्त राहील. नोकरीत मनाजोग्या घटना घडणार नाही. विपरित परिणाम दिसतील. व्यवसायात भागीदारासोबत वाद होण्याची शक्यताआहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ अपूर्ण राहिलेली कामे वेळेत करावी.कामाचा ताणतणाव राहील. व्यापारात आर्थिक बाबतीत नुकसान संभवते.फसवणूकी सारखे प्रकार घडतील. विद्यार्थ्यानी अभ्यासावर लक्ष केंद्रीन करावे. विचलित व्हाल. मनस्तापासारखा घटना घडली.
मीन अनेक नवीन संधी नवे मार्ग सापडतील. नोकरदार जोडादाराकडून आपणास सहकार्य लाभेल त्याच्या बढ़ती प्रमोशनचे आज योग आहेत. शासकीय कामकाजास दिवस शुभ आहे. इच्छित कामे मार्गी लागतील.व्यापारात नफ्यात वाढ होईल. नवीन योजनाची सुरुवात कराल.
