हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला ; मुश्रीफांवर टांगती तलवार कायम

मुंबई : ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर आज (11 एप्रिल) रोजी निर्णय होणार अशी सकाळपासूनच चर्चा चालू होती. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळणार की ईडी कारवाईला सामोरे जावे लागणार? याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.

मुंबईतील विशेष न्यायालयाने हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी पार पडल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे ईडी प्रकरणात मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम होते. आज ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला जामीन अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. हसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

🤙 8080365706