
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 23 एप्रिल रोजी होत आहे. पात्र – अपात्र उमेदवारांवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
पाटील – महाडिक गटाकडून चांगल्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.यातच काही उमेदवार निवडणुकीचे मैदान सोडून जाताना दिसत आहेत.राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून आज 13 उमेदवारांनी माघार घेतली असून आजअखेर एकूण 46 उमेदवारांनी माघार घेतली आहे.
