कर्णिक दांपत्याचे ‘ हृदम ‘ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल

कोल्हापूर : कोरोना काळात हजारो रुग्णांचे देवदूत बनलेले ,कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील चमकते तारे म्हणून ओळख निर्माण करणारे डॉ.विदुर कर्णिक व डॉ. सायली कर्णिक यांचे हृदम हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे.

या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा रविवारी संपन्न झाला.रुग्णांची परिस्थिती न पाहता त्यांची स्थिती पाहून त्यांना कोणत्याही आजारावर योग्य व आवश्यक तेवढेच तेही माफक दरात उपचार करणारे डॉक्टर अशीही या कर्णिक दाम्पत्याची ओळख आहे.हे हॉस्पिटल राजारामपुरी 13 वी गल्ली येथे सर्व सोयियुक्त सुरू करण्यात आले असून सुप्रसिद्ध डॉ.राजेंद्र भागवत आणि डॉ. विंदुसार पलंगे यांच्या हस्ते हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडला .या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निर्मितीने लाखो रुग्णांची सोय झाली आहे.

🤙 8080365706