
पुणे : राज्यात पाच दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीशी उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यात 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचं वातावरण कायम राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
