२८ मार्चला लिंगायत धर्मावर प्रशासनाधिकारी विश्वास सुतार यांचे व्याख्यान

गारगोटी :अकॅडमी ऑफ रिलीजस युनिटी तर्फे आणी भुदरगड तालुका लिंगायत धर्म याच्या वतीने आज मंगळवार दि २८. मार्चला सायंकाळी सहा वाजता ” बसवन्ना व अवैदिक लिंगायत धर्म ” या विषयावर के डी देसाई कॉलनी डॉ.सुभाष देसाई याचे घरी गारगोटी येथे व्याख्यान होणार आहे.

व्याख्याते शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी विश्वास सुतार हे व्याख्याते असून सुप्रसिद्ध डॉक्टर के ए मोमीन न हे आपले मनोगत व्यक्त करतील शिवाय गडहिंग्लज होऊन फादर जो मंत्र जीबी बारस्कर हेही खास उपस्थित असतील.

यापूर्वी इस्लाम, ख्रिश्चन आणि जैन धर्मावरती अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली होती त्याला सर्व धर्मीयांनी उत्तम प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद या व्याख्यानासाठी सर्व लिंगायत बाधंवानी व इतर सर्व धार्मियानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे अशी आग्रहाची विनंती भुदरगड तालुका लिंगायत धर्म संघटनेने आणि धार्मिक ऐक्याचे ज्ञानपिठ गारगोटी यानी केली आहे.

🤙 8080365706