
कागल : येथील,तु.बा. नाईक प्राथमिक शाळेस, राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांचे वतीने शाहू ग्रुप च्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या शुभ हस्ते इ लर्निग किट प्रदान करणेत आले.

या कार्यक्रमास तहसीलदार शिल्पाताई ठोकडे,कागल नगरपालिकेचे मुख्याधिकरी श्रीराम पोवार. याची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना श्रीराम पोवार म्हणाले, भविष्याची गरज ओळखून राबवलेला हा एक चांगला शैक्षणिक उपक्रम आहे.उपेक्षित अशा गोसावी समाज व वड्डवाडी समाजातील विद्यार्थ्यां या शाळेत शिकत असून याचा चांगला फायदा या विद्यार्थ्यांना होईल.तहसीलदार ठोकडे मॅडम म्हणाल्या, आज जिथे या किटची गरज तिथे, काळाची गरज ओळखून राजे फाउंडेशनने शैक्षणिक किट दिले आहे. राजे फाउंडेशन मार्फत फाउंडेशन मार्फत अनेक शाळेत हे कीट दिले जात आहे त्यामुळे या उपक्रमाचे मी मनापासून कौतुक करते. त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होत आहे. यावेळी, गजानन माने, संस्थेच्या सेक्रेटरी वैशाली नाईक,यांनी मनोगत व्यक्त केले. कागलच्या नगरसेविका सौ विजया निंबाळकर यांची कोल्हापूर जिल्हा डोंगरी विकास नियोजन समितीच्यासदस्यपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास शाहू चे संचालक, सचिन मगदूम, बॉबी माने, राजे बँकेचे उपाध्यक्ष, नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव ,प्रकाश पाटील, उमेश सावंत, दूधगंगा डेअरीचे उपाध्यक्ष साताप्पा घाटगे युवराज पसारे, एस ए कांबळे सुशांत कालेकर, अशितोष अथने, नगरसेविका सौ. विजया निंबाळकर, विठ्ठल निंबाळकर, उपस्थित होते. स्वागत सचिन निंबाळकर तर आभार हिदायत नाईकवडी यांनी मानले.