
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. सकाळपासून त्यांनी पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात केली आहे.

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापसी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी ‘ईडी’ने छापे टाकले होते.कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. ED चे अधिकारी जिल्हा बँकेत आले आणि सकाळपासूनच कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.अचानक बँकेत ईडीचे अधिकारी घुसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली. बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर ही छापेमारी करण्यात आली आहे.
