
बालिंगा/मोहन कांबळे
पिराची वाडी तालुका करवीर येथील सावली केअर सेंटर व भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे यांचे संयुक्त रित्या अत्याधुनिक पद्धतीचा कृत्रिम पाय कृत्रिम हात व कॅलिपर मोफत देण्यात येणार आहेत. सदर कृत्रिम पायाची व्यावसायिक किंमत पन्नास हजार पेक्षा जास्त आहे. याकरिता दिव्यांग बांधवांनी त्यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र व आधार कार्ड घेऊन नांव नोंदणी करणे आवश्यक आहे.

याकरीता सावली केअर सेंटर पिराचीवाडी तालुका करवीर येथे 90 96 95 97 51 व 77 210 99 254 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
