
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात खाजगी सावकारकीत वाढ झाली आहे. या सावकारकी प्रकरणातुन धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे.
समाजाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनली आहे.या सावकारकीसाठी वित्तसंस्था व बचत गटाचा आधार घेतला जात आहे, खाजगी सावकारांना पकडण्यासाठी एक शासकीय नियंत्रण समिती नियुक्त केली आहे.या समिती मधील पोलिस खात्यातील काही पोलिसांनी जिल्ह्या अधिकारी कार्यालयासमोरच खाजगी सावकाराबरोबर तडजोड करून प्रकरणे आपापसात मिटवल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या खाजगी सावकारांची हिंमत वाढली आहे. कर्जदारांच्या घरी जाऊन महिलांच्या बरोबर अश्लील चाळे करणे ,धमकावून भांडी व साहित्य बाहेर फेकणे इथे पर्यंत या सावकारांची मजल गेली आहे. आवाच्च सव्वा वसुली करूनही यांची आर्थिक भूक भागत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे .
करवीर व कागल तालुक्यातील अनेक गावात या सावकारांनी गोरगरिबांना त्रास देण्यात सुरू केले आहे. भीतीपोटी पोलिसात जाण्यास लोक घाबरत आहेत. दुचाकी व चारचाकी वाहने या सावकारांच्या घरी मोठ्या प्रमाणात ओढून आणल्याचे दिसत आहे .कोणाची तक्रार नाही या कारणास्तव पोलीसही टाळाटाळ करत आहेत परिणामी खाजगी सावकारकी फोफावली आहे वित्त संस्थांनी हा व्यवसाय बिनबोभाट सुरू केला असून, महिला व वसुली करणाऱ्या लोकामार्फत धमकावून गोरगरिबांना लुबाडले जात आहे.
