
कोल्हापूर : सन २०२२-२३ च्या जिल्हा परिषद कोल्हापूरकडील क्रीडा स्पर्धेस मोठया उत्साहात प्रारंभ झाला.

स्पर्धेच्या दुस-या दिवशी मुख्यालय व पंचायत समिती आजरा या पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे हस्ते नाणेफेक करुन करणेत आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई , सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्पर्धेच्या प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी व्हॉलीबॉल स्वत: खेळुन ही स्पर्धा असुन सर्वांनी खिलाडुवृत्तीने खेळ करावा अशी सुचना देवुन स्पर्धेस प्रोत्साहन दिले व सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
