‘पंचमहाभूत लोकोत्सव’मध्ये गुरुकुल विद्यालय अनुभवता येणार

कागल (प्रकाश कारंडे) : कोल्हापूर लॉर्ड मेकॉलेची शिक्षणपद्धती सोडून कुठलीही नोकरी न मिळणारी पण शंभर टक्के स्वयंपूर्ण बनवणारी शाळा म्हणजे अनोखे गुरुकुल विद्यालय कणेरी मठावर सुरु आहे.

२० ते २६ फेब्रुवारी दरम्यान होणार्या ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ मध्ये या गुरुकुलची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरु आहे.एका मूर्तीची किमत ४० ते ५० हजार रूपयांच्या घरात असून उन पाऊस झेलत शेकडो वर्ष या मुर्त्या टिकून राहतील अशा विश्वास मठाच्या प्रशासनाला आहे.सहाशेच्या वर मुर्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.मुळात कणेरी मठावर सुरु असणार्या अनोखे गुरुकुल विद्यालयामध्ये चार वेद, सहा शास्त्र आणि ६४ प्रकारच्या कला शिकविल्या जातात. या देशातील एकमेव अनोख्या विद्यालयाच प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्र ,कर्नाटक गोवा येथून शंभर जणांना निशुल्क आणि निवाशी प्रवेश देवून त्यांना देशातील १५० आधुनिक व पारंपार तज्ज्ञ शिक्षण देत आहेत.परस्पर सौहार्द निर्माण करण्याची १८५८ सालापूर्वीची क्षमता या शिक्षणात आहे. १८५८ सालापूर्वी आपल्या देशात ४०० लोकवस्तीला एक शाळा होती.इंग्रजांना आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही स्वयंपूर्ण आणि मालक बनवणारी शाळा नको होती. म्हणून त्यांनी हे मोडीत काढून चाकर निर्माण करणारी लॉर्ड मेकॉलेची शिक्षणपध्दती आणली. आज मेकॉले शिक्षणपध्दतीने परस्पर संवाद नाहीसा झाला, कुटुंबव्यवस्था व सामाजिक जीवन उद्धवस्त होत आहे. आणि केवळ चाकरमाने निर्माण झाले. शंभरातील केवळ तीन ते पाच जणांनाच नोक-या मिळतात. अशी केवळ टिका केली जाते आणि नुसते पर्यायही सुचवले जातात. परंतु केवळ पर्यायच नव्हे तर कृतीतून सक्षम पर्याय उभा केल्याचा दावा कणेरी मठाने केला असून या विद्यालयातील शिक्षण पध्दतीने कुणीही बेकार रहाणार नाही. चोरी, भिकारी,खोटारडेरपणा आणि संघर्षही करणार नाही. तर परस्पर सौहार्दच निर्माण करेल असा दावा करण्यात आला आहे. या विद्यालयातून दहा वर्षानंतर स्वयंपूर्ण होवून बाहेर पडणा-यांसाठी एकाच विषयात पी.एच.डी. करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठही स्थापले जाणार आहे.याचा अभ्यासक्रम बनवण्यात आला असून देशभरातील १५० तज्ज्ञ शिक्षक या शंभर विद्यार्थ्याना हे शिक्षण देत आहेत. पहाटे साडेचार वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत या गुरुकुल विद्यालयाची कामकाजाची वेळ आहे.

या विद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येकजण स्वयंपूर्ण, स्वयंसिध्द बनून उपजिवेकेसाठी कुणापुढेही हात पसरणार नाही. गोपालक, एक हजार वर्ष टिकणारे घर बनवणारा इंजिनअर, प्रक्रिया उद्योजक, व्यायसायिक, शिल्पकार, ज्वेलर, संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतीषशास्त्र (खगोलशास्त्र), हवामानशास्त्र, हॉर्स व बुल रायडींग, इतिहास, पाठांतर (आयुर्वेदाचे श्लोक), शिल्पवेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, युध्दकला, मॅनेजमेंट, नॅचरल सायन्स, वेदगणित, ब्युटीपार्लर अशा असंख्य ‘स्कुल मध्ये पारंगत होणार आहे. आणि इतर दहा जणांना नोक-या देवू शकेल एवढी त्याच्यात क्षमता येईल असा मठाच्या प्रशासनाला विश्वास आहे. हे सर्व शिकवताना संस्कृत, मातृभाषा, आश्रमभाषा, राष्ट्रभाषा आणि शेवटी इंग्रजी भाषेला महत्व दिले जाते. ही मुले पूर्णता ऑर्गेनिक जेवण कास्याच्या धातूच्या भांड्यातून जेवत असून जेवण बनवण्यासाठी व पाणी पिण्यासाठी पितळेची आणि मातीची भांडी वापरली आहेत. प्रवेश देताना पाल्याच्या आईवडीलांनी एक दिवस मुलासमवेत गुरुकुलात निवास करण्याच्या अटीवरच प्रवेश दिला आहे.त्यांनाही आवश्यक मार्गदर्शन केले जाते.या सर्वांची माहिती होण्यासाठी ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ मध्ये मूर्त्यांच्या माध्यमातून गुरुकुलची भव्य प्रतिकृती उभा करण्यात आली आहे. मूर्त्यांच्या माध्यमातून मानवाच्या जन्माच्या आधीपासून ते गुरुकुल मध्ये जाईपर्यंत त्यांच्यावर कोणकोणते सोळा संस्कार होतात याची माहिती कृतीतून आणि पुतळ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.

लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पध्दतीने घर आणि देश उद्धवस्त केले.म्हणून आम्ही याबाबत विचार करुन देशातील एकमेव गुरुकुल विद्यालय बनवले आहे.या मुलांना बाहेरच्या जगातल्या नोक-या मिळणार नाहीत.परंतु त्यांना मन:शांती मिळून कुणालाही उपद्रव न करता ही मुले स्वयंपूर्ण बनतील आणि इतरांनाही बनवतील.ही आमची सुरवात असली तरी यात मोठे यश मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.देशातील प्रत्येक ठिकाणी असे गुरुकुल उभारावे असाही आमचा उद्देश आहे.म्हणूनच याचा समावेश ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ मध्ये करण्यात आला आहे.’’असे श्री अदृष्य काडसिध्देश्वर स्वामीजी, कणेरी मठ यांनी म्हटले आहे.

🤙 8080365706