स्टेजवर येताच सोफा पाहून अजित पवार संतापले, कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे कायमच त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबाबत ओळखले जातात. अजितदादांच्या या स्वभावामुळे कार्यकर्तेही त्यांना चांगलेच घाबरून राहतात, याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे.साताऱ्यातील धामणेर गावातील एका कार्यक्रमाला अजित पवार आले होते, त्यावेळी अजित पवारांसाठी व्यासपीठावर वेगळा सोफा ठेवण्यात आला होता, हे पाहून अजित पवार चांगलेच नाराज झाले, आणि त्यांनी कार्यकर्त्यांना सोफा हटवण्याचे आदेश दिले.

ग्रामपंचायत विकास तसंच विकास सेवा सोसायटीच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनासाठी अजित पवार धामणेर गावात आले होते. स्टेजवर ठेवलेला सोफा पाहून अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.अजित पवारांनी आवाज वाढवून ठेवलेला हा सोफा काढायला लावला आणि सर्वांसाठी ठेवलेल्या सोफ्यापैकी एक लावण्यास सांगितलं, यावेळी कार्यकर्त्यांची मात्र मोठी धांदल उडाली. यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटीलही उपस्थित होते.

🤙 8080365706