
कोल्हापूर : येथील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ आज, शनिवारी (दि.२८) चारच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला.

अंदाजे 35 वर्षे वयाच्या महिलेचा हा मृतदेह आहे. संबंधित महिलेने आत्महत्या केली, की तिचा घातपात झाला याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही.जयंती नाल्यात मृतदेह आढळल्याची माहिती मिळतात शाहूपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी संबंधित महिलेने आत्महत्या केली असावी, किंवा तिचा मृतदेह जयंती नाल्यात टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला आहे.
