दोनवडेत पती कडून पत्नीचा खून, विजेचा शाँक बसल्याचा बनाव

कोपार्डे – दोनवडे ता. करवीर येथे विविहितेचा पतीनेच खून केलेचे उघड झाले असून अश्विनी एकनाथ पाटील (वय 28,)असे नाव आहे.

आज (शनिवार) सकाळी ही घटना घडली आहे.पती एकनाथ याला अटक केल्याचे करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले.

मिळालेली माहिती पत्नीचा शॉक लागून मृत्यू झाला असा पतीने बनाव केला होता, मात्र करवीर पोलिसांनी कसून चौकशी केली असता तो खून असल्याचा प्रकार उघडकीला आल्याचे सांगण्यात आले. दांपत्याला दोन मुली आहेत. मुलांसाठी पतीचा आग्रह होता. त्यातून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. पतीकडून अश्विनीचा शारीरिक मानसिक जाचहाट केला जात होता. असेही करवीरचे पोलीस उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले. संशयित पतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

🤙 8080365706