
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप आणि शिंदे गटाला अवघ्या 14 जागा जिंकता येतील आणि महाविकास आघाडीला तब्बल 34 जागांवर यश मिळेल असे अशी माहिती खाजगी माध्यमांच्या च्या सर्वेक्षणात समोर आली होती.याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना विचारलं असता हा सर्वे दिशा दाखवणारा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आज कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, हि जी सर्वे करणारी एजन्सी आहे त्यांची ऍक्युरीशी आपल्याला माहित आहे. या सर्वेने दिशा दाखवली आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या ती सोयीची नाही. बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यांसोबत राहणार नाही हे यातून दिसतंय आणि सत्ताधाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे असं शरद पवार म्हणाले.
