महावितरण देणार वीज दरवाढीचा शॉक?

पुणे : राज्यातील वीज ग्राहकांना वीज दरवाढीचा मोठा झटका मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. कारण महावितरण कंपनीने नुकतीच वीज युनिटचे दर वाढवण्याची मागणी केली आहे.

महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला असून त्यात तब्बल 25 टक्के दरवाढीची मागणी केली आहे. त्यानुसार विजेची किंमत 2.55 रुपये प्रति युनिट इतकी वाढण्याचा अंदाज आहे. पुढील दोन वर्षांमध्ये 67,644 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी महावितरण प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे वीज ग्राहक संघटनांनी या दरवाढीला विरोध दर्शवला आहे.

🤙 8080365706