
पन्हाळा : पन्हाळगडाला ज्याप्रमाणे ऐतिहासक वारसा लाभलेला आहे.त्याप्रमाणे पन्हाळगडाची एक क्रिडा नगरी म्हणुन देखील ओळख होवु लागली आहे.या छोट्याशा गावात व्हाँलीबाँल आणि टेनिस क्रिक्रेटच्या स्पर्धा दरवर्षी या ठरल्या सारख्याच.त्यानुषंगानेच येथील निसर्गाचे वरदान लाभललेल्या खोकड तलाव मैदानावर 26 जानेवारी प्रजाकसत्तादिनाचे औचित्य साधत व शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै.दिलीप जोशी यांच्या स्मरणार्थ भव्य अशा टेनिस बाँल क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे उद्धाटन गुरुवारी 26 जानेवारीला शाहुवाडी-पन्हाळा तालुक्याचे आमदार डाँ.विनय कोरे यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.पन्हाळ्यातील क्रिक्रेट प्रेमी ग्रुपच्या वतीने दरवर्षी सावकर चषक टेनिस बाँल क्रिक्रेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.यावर्षी या स्पर्धेचा सातवा हंगाम असुन पन्हाळ्याच्या इतिहासातील सर्वात मोठी टेनिस बाँल क्रिक्रेट स्पर्धा ठरली आहे.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक फक्ररुद्दीन मुजावर यांच्या वतीने रोख 75हजार555 रुपये व चषक,द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सचिन पाटील यांच्या वतीने 55 हजार 555 रुपये व चषक,तर उपांत्य सामन्यात पराभुत संघाना माजी उपनगराध्यक्ष शरयु लाड व रविंद्र धडेल यांच्या वतीने प्रत्येकी 10 हजार 555 रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.तर पराग जोशी यांच्या वतीने वैयक्तिक पारितोषिके प्रदान करण्यात आली आहेत.तर या स्पर्धेचे सहप्रायोजक हाँटेल आँरेंज हे आहेत.आमदार.डाँ.विनय कोरे यांच्या हस्ते मैदानाचे पुजन व श्रीफळ वाढवुन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी पहिल्या सामन्यातील दोन्ही संघाच्या खेळाडुंची ओळख आमदार कोरे यांना करुन देण्यात आली.यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.यावेळी फक्ररुद्दीन मुजावर,सचिन पाटील,रविंद्र धडेल,माजी नगराध्यक्ष विजय पाटील,तय्यब मुजावर,माजी नगरसेवक जीवन पाटील,हाँटेल आँरेज ग्रुपचे मालक मोहसीन मुजावर,संतोष गवळी,संजीवन नाँलेज सिटीचे चेअरमन पी.आर.भोसले,माजी नगरसेवक अख्तर मुल्ला,नियाज मुल्ला यांच्यासह आदी मान्यवरांसह क्रिक्रेटप्रेमी उपस्थितीत होते.सुत्रसंचालन मुतंजर मुजावर यांनी केले.यास्पर्धाचे नेटके नियोजन होण्यासाठी व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नवाज फरास,अकिब मोकाशी,मुनाफ मुजावर,मोहसीन मुजावर यांच्यासह खेळाडु परिश्रम घेत असुन स्पर्धेत 32 संघांनी सहभाग नोंदवला आहे.तरी या स्पर्धेनिमित्त टेनिस बाँल क्रिक्रेटचे आंतराराष्ट्रीय खेळाडुंसह अनेक नामवंत खेळाडु या स्पर्धेच्या निमित्ताने पन्हाळगडावर येणार आहेत.ही एक क्रिक्रेटप्रेमीसाठी पर्वणीच ठरणाप आहे.
