कुंभी-कासारी बिनविरोधचे प्रयत्न असफल

कुडीत्रे : कुंभी-कासारी साखर कारखान्याची निवडणुक बिनविरोध करण्यासाठी आ. पी. एन. पाटील व आ. विनय कोरे यांनी ११ जागेचा चंद्रदीप नरके यांच्या गटाकडे प्रस्ताव ठेवला होता. याचे उत्तर अद्याप आले नसल्याने बिनविरोधचे प्रयत्न असफल ठरले आहेत. दुरंगी लढत निश्चित झाली आहे. शाहू आघाडी शुक्रवारी किंवा शनिवारी पॅनल जाहीर करणार आहे.

योग्य प्रस्ताव होता. तो त्यांनी मान्य करायला हवा होता. आ. पी. एन. पाटील यांनी मला चर्चा करण्यास सांगितले होते. शाहू आघाडीमध्ये आमचे काही उमेदवार आहेत. त्यामुळे मी यांच्या प्रचारात भाग घेणार आहे असे आ. विनय कोरे यांनी सांगितले.

निवडणुक बिनविरोध करण्यासाठी नुकताच आ. पी. एन. पाटील व आ. विनय कोरे यांनी ११ जागेचा प्रस्ताव चंद्रदीप नरके गटाकडे ठेवला होता. आमदार सतेज पाटील यांनीही शाहू आघाडीच्या नेत्यांना कारखाना बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे कारखाना बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. बिनविरोध होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.व

दरम्यान माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी गेले दोन दिवस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडे मातब्बर उमेदवार आहेत. बंडखोरी होऊ नये म्हणून त्यानी उमेदवारांच्या नावाबद्दल अत्यंत गोपनीयता पाळली आहे. माघारीच्या शेवच्या दिवशीच म्हणजे 30 जानेवारीला पॅनल मध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत , हे पॅनल निश्चितच तगडे असेल असे त्यांच्या निकटवर्तीय कडून सांगण्यात आले. नरके यांनी गेले 20- 25 दिवस पायाला भिंगरी लावून मतदारसंघा चा दौरा केला आहे. सर्वच तालुक्यातुन आपल्या पॅनल ला सुरवातीपासूनच प्रतिसाद मिळग आहे असेही त्यांनी सांगितलं.मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पॅनल मध्ये नवीन किमान दहा चेहरे असतील असे समजते.अत्यंत तगडे असे पॅनल करण्यासाठी अध्यक्ष नरके यांचे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. दोन्हीकडील उमेदवारांच्या आत्ता पासूनच गावागावांत गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

🤙 8080365706