साऊथ कलाविश्वातील वाईट बातमी ……

मुंबई : साऊथ सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. साऊथ कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जमुना यांचं निधन झालयं.

जमुना यांनी वयाच्या ८६ वर्षी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या निधनामुळे कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जमुना वयाशी संबंधित आजारांमुळे त्रस्त होत्या. आजाराने त्रस्त असलेल्या जमुना यांनी हैदराबाद याठिकाणी असलेल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच साऊथ इंडस्ड्री आणि चाहत्यांच्या मनामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

जमुना यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ड्रीला मोठं नुकसान झालं आहे. असं म्हणायला हरकत नाही. जमुना यांच्या निधनानंतर सुपरस्टार ज्यूनियर एनटीआर याने ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. ज्यूनियर एनटीआर ट्विट करत म्हणाला, ‘जमुना यांनी जवळपास ३० वर्षांपेक्षा जास्त तेलुगू कलाविश्वात राज्य केलं. जमुना यांनी त्यांच्या सिनेमातून आमच्या मनावर छाप पाडली आहे. गुंडम्मा कथा, मिसम्मा यांसारख्या सिनेमामध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं..’ अशा भावना अभिनेत्याने व्यक्त केल्या.

🤙 8080365706