
मुंबई : आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याने ऑस्करमध्येसुद्धा जागा बनवली आहे. या गाण्याला ओरिजनल साँग कॅटेगरीसाठी नॉमिनेशन मिळाले आहे.

ऑस्कर 2023 साठी अंतिम नामांकने जाहीर झाली आहेत.यामध्ये RRR या भारतीय चित्रपटातील नातू-नातू या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. नुकतेच गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात नातू-नातू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला होता. तर RRR ने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट आणि नाटू -नाटूने समीक्षकांच्या पसंती पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गाणे जिंकले.
