समाज कल्याण समितीच्या बैठकीत योजनांना मंजुरी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण समितीच्या आज झालेल्या बैठकीत मागासवर्गीयांसाठी असलेल्या विविध योजना व अनुदान योजनांना मंजुरी देण्यात आली. अशी माहिती समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली.

इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी मध्ये शिकणान्या मागासवर्गिय मुलां-मुलींना सायकल घेण्यासाठीअनुदान योजनेस मंजुरी देण्यात आली. मागासवर्गीय मुलां- मुलींना सायकल करीता अनुदान या योजनेसाठी प्रत्येकी १२५ लाभार्थी उदिदष्ट होते. त्यापैकी मुलांना सायकल या योजनेकरीता ९७ व मुलींना सायकल करीता ९९ प्राप्त अर्जानुसार मंजूरी देण्यात आली.अद्यापी मुलांना सायकल करीता २८ लाभार्थी व मुलींना सायकल करीता २६ लाभार्थी यामध्ये पुढील प्रवर्गाचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष प्रवर्ग आवश्यक आहेत. तरी ज्या ग्रामिण क्षेत्रात रहिवासी असणा-या विद्यार्थी विद्यार्थीनींना सायकल आवश्यक आहे अश्या विद्यार्थी / विद्यार्थीनींनी १३ फेब्रुवारी २०२३ अखेर पंचायत समितीकडे अर्ज सादर करण्यात यावेत. त्याचबरोबर मागासवर्गिय व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधने व उपकरणे पुरविणे यामध्ये भागातील मागासवर्गिय व्यक्तीना स्वयंरोजगारासाठी ओला सुका मसाला ही योजना घेण्यात आली आहे.

कोरोना महामारी मुळे ज्या घरातील पुरुषांचे निधन झाले आहे अश्या कुंटूबातील पत्नी अथवा अवंलवित (मागासवर्गिय अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष प्रवर्ग) महिलांना ओला / सुका मसाला मशिन देणेस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी १३ फेब्रुवारी २०२३ अखेर पंचायत समितीकडे अर्ज सादर करण्याचे आहेत .

तसेच ५ टक्के दिव्यांग निधीतून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहभाग घेतलेल्या व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामिण भागातील दिव्यांग खेळांडूना अर्थसहाय्य देण्याबाबत बैठकीत निर्णय झाला.दिव्यांग खेळाडूंना खेळासाठी करावा लागणारा प्रवास, निवास, सरावासाठीचा खर्च पहाता अश्या खेळांडूना पुर्वी प्रमाणे अर्थसहाय्य देणेबाबत निर्णय घेणेत आला असल्याचे समाज कल्याण अधिकारी घाटे सांगितले .

🤙 8080365706