शाहूच्या सभासदांना ऊस विकास योजने अंतर्गत अनुदानाचे चेक वाटप

कागल येथे ऊस विकास योजना अंतर्गत सभासदांना चेक वाटपवेळी अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,संचालक युवराज पाटील, सचिन मगदूम,संजय नरके कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजना अंतर्गत विविध योजनेतील ५२लाभार्थी सभासदांना अनुदान चेक वाटप कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते केले.

कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व .राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी दूर दृष्टीने कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढावे उद्देशाने सभासद शेतकऱ्यांसाठी ऊस विकास योजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहेयावेळी ५२सभासद शेतकऱ्यांना ३ लाख ८३ हजार ६२५ रूपये इतक्या रकमेचे अनुदान स्वरूपात वाटप केले.यावेळी श्री.छत्रपती शाहू साखर कामगार संघामार्फत मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना व भागविकास निधी अंतर्गतही चेक वाटप केले.

यावेळी श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास व्ही एस आय पुणे यांचा *कै.विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार* व देशाची शिखर संस्था असलेल्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी नवी दिल्ली यांचा यांचा *देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना* असे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्षा श्रीमती घाटगे यांचा महिला सभादांनी सत्कार केला.ऊस विकास योजनावाईज लाभार्थ्यांचा सविस्तर तपशिल असा.कंसात अनुदान रक्कम श्रीमंत विजयादेवी घाटगे महिला ठिबक योजना -६(६१४२५)जनरल ठिबक सिंचन योजना- ३८(२८३७७५),मोटर पाईपलाईन योजना-१(३४२५)पॉवरटिलर -७ (३५०००) कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,संचालक युवराज पाटील, सचिन मगदूम,संजय नरके कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,शेती अधिकारी रमेश गंगाई ,ऊ स विकास अधिकारी के.बी.पाटील आदी उपस्थित होते.

🤙 8080365706