बाळासाहेब ठाकरेंच्या नावासमोर हिंदूह्‌दय सम्राट न लावता शिवसेनाप्रमुख लावले पाहिजे : अजित पवार

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर केवळ हिंदूह्‌दयसम्राट एवढं न लावता शिवसेनाप्रमुख हे लावले पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरे हे फक्त हिंदूचे नेते नव्हते, तर सर्व जातीधर्माचे नेते होते. अशी सूचना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात केली.

मुंबईतील विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण कार्यक्रम सुरू आहे. त्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर केवळ हिंदूह्‌दयसम्राट असे लावण्यात येऊ नये. ठाकरे यांच्या नावासमोर शिवसेनाप्रमुख असेही असावे अशी सूचना केली.अजित पवार म्हणाले की, शिवसेनाप्रमुख पदाशिवाय बाळासाहेब ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला अपूर्ण आहे. त्यामुळे हिंदूह्‌दय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे नाव प्रतिमेवर लिहिलेले आहे. त्याऐवजी शिवसेनाप्रमुख, हिंदूहदयसम्राट असे करावे, अशी माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या उसभापतींना विनंती आहे.

🤙 8080365706