उंचगाव येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन; विविध उपक्रमांनी जयंती साजरी

कोल्हापूर :उंचगाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जय जय कारांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यावेळी उंचगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच विराग करी, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, मा. उपतालुकाप्रमुख विक्रम चौगुले, महेश जाधव, किर्ती मसुटे, दत्ता यादव, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील पोवार, गावप्रमुख दिपक रेडेकर तसेच उंचगावतील महाविकास आघाडीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फोटो पूजनानंतर मसाले दूध वाटप करण्यात आले.

🤙 8080365706