
कागल : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत जवळपास 1700 हून अधिक कुटुंबांना कागल येथे मोफत विमा आरोग्य कार्डाचे घरपोच वाटप भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने कागल विधानसभा मतदारसंघात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असून या योजनेच्या माध्यमातून एका कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षण मिळणार आहे. सदरची योजना कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 35 खाजगी व सरकारी हॉस्पिटल ला लागू होणार असून पाच लाखापर्यंतच्या दवाखाना खर्चातून त्या कुटुंबाची पूर्णपणे मुक्तता होणार आहे. कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ होण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही मोहीम यापुढेही प्रभावीपणे राबवली जाणार आहे.
