कोजिमाशि’च्या अध्यक्षपदी अनिल चव्हाण यांची निवड…..

फुलेवाडी : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल ईश्वरा चव्हाण (कोरगावकर हायस्कूल, कोल्हापूर) यांची, तर उपाध्यक्षपदी शरद तावदारे (हेरवाड हायस्कूल, ता.शिरोळ) यांची बिनविरोध निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. ओतारी बैठकीस अध्यक्षस्थानी होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी निवड प्रक्रियेचे वाचन केले.या वेळी माजी चेअरमन डॉ. दत्तात्रय घुगरे, पांडुरंग हळदकर, संचालक बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे, श्रीकांत पाटील, मदन निकम, सुभाष खामकर, अविनाश चौगले, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, श्रीकांत कदम, जितेंद्र म्हैशाळे, उत्तम पाटील, प्रकाश कोकाटे, मनोहर पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे, ऋतुजा पाटील, शीतल हिरेमठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे, प्रशासन अधिकारी उत्तम कवडे, संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते. निवडीनंतर शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते चव्हाण व तावदारे यांचा सत्कार करण्यात आला.

🤙 8080365706