बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी प्रकरणी आणखीन एक एजंट जेरबंद…

गारगोटी : बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून भूदरगड पोलिसांनी आणखी एक एजंटला अटक केली आहे. अमोल सुरेंद्र सुर्वे (वय 42, रा.रुई ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आज रविवारी (दि. 22) पहाटे ४ च्या सुमारास सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे. (Kolhapur) बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी प्रकरणी सर्जेराव अशोक पाटील (वय- ३२ रा. शिरसे, ता. राधानगरी) याला गुरुवारी (दि.२१) अटक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत याप्रकरणी मुख्य सुत्रधार विजय कोळस्करसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

🤙 8080365706