
मुंबई – सध्या परदेशात T20 लीग सुरु आहेत. या लीगमध्ये IPL मधील फ्रेंचायजींनी टीम विकत घेतल्या आहेत. दुबईमध्ये इंटरनॅशनल लीग T20 सामन्यात मुंबई इंडियन्सने अबु धाबी नाइट रायडर्सवर रोमहर्षक विजय मिळवला.

ड्वेन ब्राव्हो आणि नजीबुल्लाह जादरान MI अमीरातच्या विजयाचे हिरो ठरले. अशक्य वाटणारं लक्ष्य ब्राव्हो-जादरानने सोपं बनवलं. अबु धाबी नाइट रायडर्सने पहिली बॅटिंग केली. MI अमीरातला विजयासाठी 171 धावांच लक्ष्य दिलं होतं. कायरन पोलार्डच्या टीमने शेवटच्या चेंडूवर हे लक्ष्य पार केलं. 5 विकेट राखून MI अमीरातने विजय मिळवला.पहिल्या बॉलपासून हल्लाबोलMI अमीरातला विजयासाठी लास्ट ओव्हरमध्ये 20 धावांची गरज होती. हे लक्ष्य अनेकांना अशक्य वाटत होतं. पण ब्राव्हो आणि जादरानने प्लानिंग केली होती. आंद्रे रसेल लास्ट ओव्हर टाकणार होता. ब्राव्हो-जादरानने पहिल्या चेंडूपासून रसेलच्या बॉलिंगवर हल्ला चढवला.
