किडनीच्या आरोग्याला चांगल ठेवण्यासाठी कोणतं तेल योग्य?

आरोग्य टिप्स : किडनीच्या रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.  किडनीच्या आरोग्याला चांगल ठेवण्यासाठी कोणतं तेल योग्य ठरतं ते पाहूया.

तेल तब्येतीसाठी चांगले असते. कारण शरीराला आवश्यक असलेले फॅट्स त्यात असतात. जास्त फॅट्सयुक्त पदार्थांमुळे कोलेस्टेरॉल, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर वाढतं. यामुळे फक्त हार्ट नाही तर किडनीसुद्धा कमकुवत होते.

1) किडनीशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांना फ्लेक्ससीड तेलाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. किडनीचे कार्य सुधारण्यासाठी फ्लेक्ससीड तेल प्रभावी असल्याचे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे.

2) तांदळाच्या कोंड्याच्या  तेलामध्ये असे पदार्थ असतात जे शरीराद्वारे शोषले जाणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करू शकतात. तांदळाचा कोंडा कॅल्शियमचे शोषण देखील कमी करतो, ज्यामुळे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध होतो.

3) व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल मोनोअनसॅच्युरेटेड फॅटमध्ये समृद्ध आहे, जे कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासोबतच हे किडनीला आजारांपासून वाचवते.

4) बदामाच्या तेलामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असते, जे लठ्ठपणा आणि रक्तातील साखर वाढण्यापासून रोखण्याचे काम करते. कारण जास्त वजन आणि रक्तातील साखरेची वाढलेली पातळी दोन्ही किडनी खराब करण्याचे काम करतात, अशावेळी बदामाचे तेल किडनीच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.

🤙 8080365706