
मुंबई : कंपनीने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. अमेझॉननं आपल्या एक सेवेचे पैसे वाढवले आहेत. फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत.

त्यामुळे ज्या ग्राहकांनी ही सेवा घेतली आहे, त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन फेब्रुवारीपासून काही म्युझिक सब्सक्रिप्शन प्लॅनच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा कंपनीने केली.
Amazon.com आपल्या वेबसाइटच्या एफएक्यू पेजवर अपडेट पोस्ट केले. रॉयटर्सनुसार, अॅमेझॉन म्युझिकचा ‘अनलिमिटेड इंडिव्हिज्युअल प्लॅन’ किंमत 1 डॉलरवरून 10.99 डॉलर प्रतिमहिना करणार आहे, तर त्याचा ‘अनलिमिटेड इंडिव्हिज्युअल स्टुडंट प्लॅन’ दरमहा 4.99 डॉलरवरून 5.99 डॉलरपर्यंत वाढणार आहे.
