
पन्हाळा : कणेरी पैकी गवळेवाडी, ता. पन्हाळा, येथील ग्रामस्थांनी गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला.

निवेदनात म्हंटले आहे की, गवळी बांधव स्वतःची घरे बांधून एकत्रीत स्वातंत्रपूर्वी काळापासून या ठिकाणी राहत आहोत गट नं. ५२६ मध्ये दिड एकर जागेवर संपुर्ण गवळेवाडी अव्याहतपणे वहीवाट करून वास्तव्य करत आहे.यामध्ये शाळा,अंगणवाडी,राधाकृष्ण मंदिर, रस्ता, लाईट,पाणी, सर्व सुविधा घरफाळा, असेसमेंट उतारा, ग्रामपंचायत व शासनाने पुरवठा केला आहे. गेले अनेक वर्षे तिथे वास्तव्यास असून. शिवाजी केरबा गवळी, दिपक शिवाजी गवळी, अर्जुन केरबा गवळी, रोहित भिवाजी गवळी, मधुकर केरबा गवळी वगैरे सर्वजण येथील वहीवाट करणेस रस्त्याने जाणे-येणेस,मंदिरात जाणेस मज्जाव करतात. घराजवळील थड, गार, शेड, जनावरांचे शेड, संडास, जी.सी.बी.ने काढले आहेत व आमच्या सर्व घरातील कुटूंबांना शिवीगाळ व धमकी देवून जिवे मारण्याची धमकी देत आहेत. वेळोवेळी तहसिलदार, प्रांताधिकारी व पोलीस स्टेशनला गेली वर्षेभर अर्ज दीले पण न्याय मिळालेला नाही.जर आम्हाला येत्या आठ दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तसेच आमची गावगुंडांच्या त्रासापासून सुटका झाली नाही तर आम्ही येथील सर्व तीस कुटूंबे तहसिल कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. म्हणुन निवेदन दिले.