वेतवडे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवाजी निवृत्ती पाटील यांची निवड

वेतवडे नुतन उपसरपंच शिवाजी पाटील

पन्हाळा : वेतवडे ता.पन्हाळा येथील उपसरपंचपदी शिवाजी निवृत्ती पाटील यांनी निवड झाली.त्यांनी विरोधी उमेदवार गीता पाटील यांचा सात विरुद्ध तीन मतांनी पराभव केला.

निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन विजय बुराण यांनी काम पाहिले.वेतवडे ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी नुतन सरपंच रेखा अनिल पोवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती.

यावेळी उपसरपंचपदासाठी सत्ताधारी आघाडीच्या वतीने शिवाजी निवृत्ती पाटील तर विरोधात गीता अभिजित पाटील असे दोन अर्ज दाखल करण्यात आले.दोन्ही अर्जाची छाननी होवुन अर्ज वैध ठरले.त्यानंतर माघारीपर्यंत दोन्ही अर्ज शिल्लक राहिल्याने मतदान घेण्यात आले.यावेळी शिवाजी पाटील यांना 7 तर विरोधी गीता पाटील यांना 3 मते मिळाली.त्यामुळे 7 विरुद्ध 3 मतांनी शिवाजी पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी विजय बुराण यांनी घोषित केले.यानंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आले.गावच्या विकासाठी सर्वांना विश्वात घेवुन प्रयत्न करणार असल्याचे नुतन उपसरपंच शिवाजी पाटील यांनी सांगितले.यावेळी नुतन सदस्यासह सरपंच, उपसरपंच यांचा कार्यालयीन प्रवेश देखील करण्यात आला.यावेळी आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545