
साळवण:विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन, गरजेतून नाविण्याचा शोध लागावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, शोधक वृतीला व्यासपीठ मिळावे म्हणून विज्ञान प्रदर्शने भरवली जातात.भावी पिढीला विज्ञान वरदान ठरावे,त्याचे तोटे कमी कसे करता येतील यासाठी प्रयत्न करावे.संशोधन वृत्ती वाढवावी. पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या मागे न धावता आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, याकडे अधिक लक्ष द्यावे.असे प्रतिपादन माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज शेळोशीचे संस्थापक अध्यक्ष पी.जी.शिंदे यांनी केले. ५०व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गटविकास अधिकारी माधुरी परीट ,संस्था सचिव स्वप्नील शिंदे यांनी केले. ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा जागर घालण्यात आला. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम सादर करण्यात आला. अशोक पाटील लिखित ‘रणांगण ‘ चा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थी शिक्षक अशा पाच गटातून ५८ उपकरणांची नोंद झाली होती. याकरणांमध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, कचरा व्यवस्थापन ,आधुनिक कृषी अवजारे ,तंत्रज्ञान व खेळणी पर्यावरण अनुकुल उपकरणांचा समावेश होता. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण आर.पी. पाटील, सतीश शिंगे यांनी केले. तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य वाय. ए. पाटील , गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळेगट विस्ताराधिकारी आर. आर. कुंभार, केंद्रप्रमुख आर. यु. गांगुर्डे,गजानन कांबळे, तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद माध्यमिक विद्यालयाचे सर्व अध्यापन वृंद कर्मचारी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.