KDCC बँक कोल्हापूर कडून विकास सेवा संस्थांचे पदाधिकारी यांना प्रशिक्षण शिबिर

साळवण: महाराष्ट्र राज्य को-ऑप. बँक लि., मुंबई यांच्या मार्फत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विकास सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी गगनबावडा येथील भक्त निवासमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराचे आज उदघाटन मा. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने व महाराष्ट्र राज्य बँकेचे बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

विकास सेवा संस्थेच्या रुपाने सरकारने शेतक-यांच्या दारात बँक उपलब्ध केली आहे. सर्वसामान्यांची उन्नती करण्यात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. शासकीय बँकांच्या पुढे एक पाऊल टाकत कोल्हापूर जिल्हा बँकेने गतिमान योजना सुरु केल्या आहेत. शेतकरी वर्गास नवसंजीवनी मिळण्यासाठी बदलती धोरणे लागू केली आहेत. सेवा संस्थांनी काटकसरीचा कारभार करत उन्नती साधावी असे मत यावेळी बोलताना मा. आमदार सतेज पाटील यांनी मांडले. 

विकास सेवा संस्‍थेच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील शेतक-यांचे अर्थकारण चालते. सेवा संस्थेची यशस्वी झालेली विश्वासाची आर्थिक व्यवस्था टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.‍ संस्थेचे पदाधिका-यांनी सेवा संस्थांचा कारभार पारदर्शक करून संस्थांची १०० टक्के वसुली करावी असेही म्हणाले .या कार्यक्रम प्रसंगी डी. वाय. पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन बी. डी. कोटकर, संचालक मानसिंग पाटील, बजरंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, महादेव पडवळ,  सहदेव कांबळे, पांडुरंग पडवळ, तालुक्यातील सहकारमहर्षी कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपुरक संस्थेचे अध्यक्ष मा. विलास पाटील, माजी जि. प. सदस्य संभाजी पाटणकर, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बँकेचे व्यवस्थापक बावदणकर, उपव्यवस्थापक राजू पाटील, विभागीय अधिकारी एल. डी. पाटील, शाखाधिकारी एल. आर. सरनोबत, निरीक्षक एम. ए. कांबळे, निरीक्षक सुरेश पाटील यांच्यासह तालुक्यातील सेवा संस्थेचे पदाधिकारी, सचिव, जिल्हा बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार एफ. एल.सी. प्रमुख दामोदर गुरव यांनी केले.
🤙 9921334545