
मुंबई – प्रत्येकच पावसाळ्यात मुंबाईची तुंबई होते. पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणारे पाणी ही मुंबईकरांच्या दृष्टीने सर्वात गहण समस्या ठरली असून या समस्येवर उपाय म्हणून पाणी शोषून घेणाऱ्या ‘पोरस’ काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार होणारे काँक्रीटचे रस्ते पावणाचे पाणी शोषूण घेतील. यामुळे अतिवृष्टीत मुंबईच्या रस्त्यांवर तुंबणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.मुंबईत महापालिकेचे सुमारे २ हजार किमीचे रस्ते आहेत. सर्वच रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनवण्याचे धोरण पालिकेने स्वीकारले आहे. यामधील सुमारे १ हजार किमी रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्णही झाले आहे. शिल्लक रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रीटचे बनवण्यात येत आहेत. यामध्ये ३९७ किमी रस्त्यांसाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. हे काम ४ महिन्यांचा पावसाळ्याचा कालावधी सोडून वेळेत पूर्ण करून घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा अनुभव असलेल्या, तसेच दर्जेदार रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत