
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं काय हे जाणून घेतलं जाणार आहे.सह्याद्री अतिथीगृहावर चौकशीकोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिपरिक्षेत्राचे महानिरीक्षक होते तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते.
याशिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. या सगळ्यांची चौकशी केली जाणार आहे. तसंच या प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार हिची देखील आयोगासमोर चौकशी होणार आहे. 21 ते 25 जानेवारी दरम्यान सह्याद्री अतिथीगृह इथे या सगळ्यांची चौकशी होणार आहे.