जलजीवन योजनेचा ४०० कोटीहून अधिक निधी आणला ;आ. हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

चिमणे .ता आजरा येथे  जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचा शुभारंभ करताना आमदार हसन मुश्रीफ. शेजारी सरपंच सुनिल कांबळे , वसंतराव धुरे , संभाजी तांबेकर , काशिनाथ तेली .

चिमणे :जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात ४०० कोटींहून अधिक निधी आणला, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.

चिमणे ता. आजरा येथे जलजीवन पाणीपुरवठा योजनेच्या प्रारंभात आमदार मुश्रीफ बोलत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे होते.          

आमदार मुश्रीफ म्हणाले , पहिल्या नळपाणी योजनेची उंची जास्त असल्याने वारंवार तक्रारी येत होत्या. परिणामी वीज बिलही अधिक येत होते . चिकोत्रा प्रकल्पातून ही योजना होत असून पारदर्शक काम चिमणे ग्रामस्थांनी ठेकेदार कडून करून घेणे गरजेचे आहे . गावाला मुबलक पाणी मिळेल यासाठी प्रयत्न करूया . गावातील सर्व विकास कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार असून चिमणे – झुलपेवाडी रस्त्यास अधिक प्राधान्य देऊ . गावातील हेवेदावे विसरून विकास कामे करून घ्या, असा सल्लाही त्यांनी ग्रामस्थांना दिला .  सरपंच सुनिल कांबळे ग्रामस्यांचे पाण्याचे हाल कसे होते सांगून गावच्या विकासात ग्रामस्थांची मदत घेणार असल्याचे सांगितले .         

यावेळी संभाजी तांबेकर , भूषण नादवडेकर , वसंत तारळेकर, वसंत धुरे यांची भाषणे झाली. 

यावेळी शिरीष देसाई, काशिनाथ तेली, वसंतराव धुरे, बी ए . नादवडेकर , विजय वांगणेकर , बबन पाटील , सुनिल दिवटे, प्रभाकर येसादे . आनंदा बेलकर, अभिजित मोरे , बाबुराव मोरे .गुंडू चव्हाण, सहदेव चव्हाण.हणमंत चव्हाण , दत्तात्रय खेडेकर , उपसरपंच गुणवंता बेलकर. सुरेखा शिंदे, सुजाता नादवडेकर , वंदना येसादे आदी ग्रामस्थ उपस्थित होते . प्रास्तविक सरपंच सुनिल कांबळे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रमोद तारळेकर यांनी केले . प्रविण चव्हाण यांनी आभार मानले .