सोम्या-गोम्यांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही; अजित पवार….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार आज चांगलेच संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचा राग अनावर झाला. सोम्या-गोम्यांचा प्रश्नांना आपण उत्तर देणार नाही, असे ते म्हणाले.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. नाशिकमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका केली होती. पडळकर म्हणाले होते की, ५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला. तुम्ही एक हजार कोटी राज्य सरकारचे नेता. तुमच्याकडं तिजोरी दिली आहे. ती गडप करू नका. ती राज्याची तिजोरी आहे. तुमच्याकडं एका विश्वासानं राज्यानं दिली. असतेपत्रकारांनी हा मुद्दा पकडून गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी पहिल्यांदा तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. “अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन पाठवलंय. तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही. असं ये म्हणाले होते.