२०२४ ला कागलमध्ये परिवर्तन अटळ ; राजे समरजितसिंह घाटगे

कागल येथे भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्या सत्कारवेळी बोलताना शाहू ग्रूपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे .समोर उपस्थित जनसमुदाय

कागल : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे.टीका करणाऱ्यांना यातून चोख उत्तर मिळाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रूपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

ते येथील ऐतिहासिक गैबी चौकात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे विजयी झालेले नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,निवडणूक लढलेल्या व माघार घेतलेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले, शाश्वत विकासाचे व्हीजन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आणि आमची जिजाऊ महिला समिती काम करणार आहे. शाश्वत विकासाबरोबर युवक व महिला स्वावलंबी बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. तेच आमचे व्हिजन राहणार आहे. विरोधक टीका करू देत . आमच्या कामाचे श्रेय ते घेऊ देत. आमच्या उपक्रमांची कॉपी करू देत. आम्ही मंजूर करून आणलेल्या योजनांचे उदघाटन विरोधक करत आहेत.

या श्रेयवादात आम्हाला पडायचे नाही. निवडणूक आली की मला सांभाळा. मी पाच वर्ष तुम्हाला सांभाळतो. हे पंचवीस वर्षे सुरु आहे. या पारंपारिक राजकारणाला फाटा देण्याची वेळ आलेली आहे. 2024 मध्ये परिवर्तनासाठी कागलची जनता तयार आहे. याचा मला रास्त अभिमान आहे.राजमाता राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे म्हणाल्या, शासनाने महिलांना 50 टक्के आरक्षण दिले आहे. त्याचं प्रतिबिंब या गैबी चौकात दिसते. महिलांना भगव्या फेटात बघून आणि हा गैबी चौक भगवा झालेला पाहून खूप छान वाटते. या ठिकाणी पुरुषांच्या संख्येपेक्षा विजयी महिलांची संख्या जादा दिसते. महिलांसाठी हा मोठा आत्मसमान आहे. असे सांगून त्या पुढे म्हणाल्या,प्रत्येक मातेमध्ये जिजाऊ आहे. आजच्या संघर्षाच्या काळात याच जिजाऊना आम्हाला पुढे आणायचे आहे.ग्रामीण माता -भगिनी या ग्रास रूटवर काम करत असतात त्यामुळे गावच्या विकासाची छोटे-मोठे प्रश्न त्यांना माहीत आहेत . आज तुम्ही ग्रामपंचायत मध्ये निवडून गेला आहात.त्या पदाचा वापर गावच्या विकासासाठी करा. राजमाता जिजाऊ महिला समिती तुमच्यासोबत गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.यावेळी बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील म्हणाले, आधी काम करणार मगच सांगणारंअसं नेतृत्व आपल्याला समरजीत राजेंच्या रूपात मिळालेलं आहे. ग्रामपंचायतील यश …ये तो झाकी है . आगे बहूत कुछ बाकी है. कागल मध्ये परिवर्तन करायचं हे जनतेनेच ठरवलं आहे.अशोक आण्णा चराटी म्हणाले,जनतेचे ठरलय, आता राजेच आमदार…कागलच्या आमदारांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीत मला पाडण्यासाठी आज-यात चार दिवस तळ ठोकला.त्यामुळे माझी जबाबदारी आता वाढली असून कागलमध्ये जनतेला बदल घडवायचा आहे.

त्यामुळे केवळ आमचेच नाही तर जनतेचेही आता २०२४ला राजेंना आमदार करायचे ठरले आहे.त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडानिशी दाद दिली.यावेळी करंबळीचे अॕड.विकास अण्णा पाटील ग्रुप व सरपंच अनुप पाटील यांच्यासह कडगावचे युवा कार्यकर्ते शहाजी पाटील संग्राम घाटगे संग्राम पाटील नागेश मोरे व माऊली संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याबद्दल श्री घाटगे यांच्या हस्ते त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.गोड साखरचे चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर हे बाहेर गावी असलेने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.परंतु त्यांच्या कौलगे गावचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांची व्यासपीठावरील उपस्थिती लक्षवेधी होती. व्यासपिठावर, विरेंद्रसिंहराजे घाटगे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, डॉ शहापूरकर गटाचे गणपतराव डोंगरे, राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील, गडहिंग्लज व कागलचे भाजप जिल्हाध्यक्ष अनुक्रमे विठ्ठल पाटील व संजय पाटील करंबळीचे सरपंच अनुप पाटील कडगावचे शहाजी पाटील आदी उपस्थित होते.स्वागत उत्तम पाटील यांनी केले.आभार प्रताप पाटील यांनी मानले.

चौकट

जनताच त्यांच्या डोक्यातील हवा काढेल..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या राष्ट्रवादी पक्षाने जातीयवादी म्हणून हिणवले त्यांच्याच योजनांचा त्यांना आज घरोघरी पोहोचण्यासाठी तुम्हाला आधार घ्यावा लागत आहे.तुमच्या डोक्यातील सत्तेची हवा व हव्यास अजूनही गेलेला नाही.जनताच ती काढून टाकेल. असा टोला घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांना नाव न घेता लावला.

चौकट

कौलगे ता. गडहिंग्लज येथील सरपंच व सदस्यांची उपस्थिती

गोड साखरचे चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर याना या कार्यक्रमास निमंत्रित केले होते पारुंतू ते बाहेर गावी असलेने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.परंतु त्यांच्या कौलगे गावचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांची व्यासपीठावरील उपस्थिती लक्षवेधी होती.

🤙 8080365706