
मुंबई : वेळेत गाळ उपसला जात नसल्याने मुंबईतील नाले दरवर्षी पावसाळ्यात तुंबतात त्यामुळे लगेचच मुंबईची तुंबई होत होती पण यंदा असे होऊ नये यासाठी पालिकेने नाल्यांसह मुंबईतील नद्यांमधील गाळ वेळेत उपसण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी पालिका १२५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

दरवर्षी पालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. मात्र नालेसफाई वेळेत सुरुवात होत नसल्याने १०० टक्के सफाई होत नाही परिणामी भरतीच्या वेळेस पाण्याचा निचरा होत नाही व मुंबई तुंबते. महापालिकेचा कारभार प्रशासकाकडून सुरू असून आगामी पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून पालिकेने वेळेतच नाल्यातील गाळ उपसण्याचे नियोजन आहे. मिठी नदी, पोयसर आणि दहिसर या नद्यांचाही यात समावेश आहे.
