पडळकरांच्या भावाने सांगलीमध्ये काय केले याची माहिती घेणार; अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर आले असता राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकरांवर जोरदार टीका केली. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली. पडळकरांच्या भावाने सांगलीमध्ये काय केले आहे. याची माहिती मी घेणार आहे. पदावर असलो म्हणून नातेवाईकांनी देखील नीट वागायला पाहिजे. हे मात्र सध्याच्या काळात होत नाही. त्याचप्रमाणे लोकप्रतिनीधी झाला म्हणजे शिंगे फुटली असे होत नाही. अशा कठोर शब्दात त्यांनी गोपीचंद पडळकर यांना सुनावले आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. सध्या महाराष्ट्रात विचित्र राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच महापुरूषांबाबत वारंवार अपशब्द बोलले जातात. मुद्दामून ठरवून हे करता का? शिवाजी महाराजांबद्दल वाईट शब्द वापरले तरी दिलगीरी व्यक्त करत नाहीत. माणूस आहे माणूस चुकतो पण हे थांबायला तयार नाहीत. महात्मा फुले श्रीमंत होते त्यावेळी त्यांनी पैसा समाजाला दिला. त्याला तुम्ही भीक म्हणता. त्याचप्रमाणे अजित पवार हा कुणाला घाबरणारा माणूस नाही. असं म्हणत त्यांनी चंद्रकांतदादा पाटील यांनी अजित पवारांबाबत केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर दिले.

🤙 8080365706