साखळी बॉम्बस्फोटा प्रमाणेच बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा फोन आणि….

मुंबई : 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटा प्रमाणेच बॉम्बस्फोट करण्याची आणि दंगली घडवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या धमकीचा फोन महाराष्ट्र एटीएसला आला होता.या फोननंतर प्रचंड खळबळ उडाली आणि एटीएसने तातडीने हालचाल करत या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.

याह्या खान उर्फ केजीएन लाला (वय – 55, पठानवाडी, मालाड पूर्व, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुढील दोन महिन्यात मुंबईतील माहीम, नागपाडा, मदनपुरा आणि भिंडी बाजारमध्ये 1993 सारखे बॉम्बस्फोट करण्याची आणि यानंतर उसळलेल्या दंगलीप्रमाणेच दंगली घडवून आणण्यासाठी परराज्यातून लोकंही बोलवण्यात आल्याची धमकी आरोपीने दिली होती.धमकीचा फोन आल्यानंतर महाराष्ट्र एटीएसने आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवान केली. तांत्रिक चौकशीमध्ये याह्या खान याच्याविरोधात सबळ पुरावे मिळ्यानंतर एटीएसने त्याला अटक केली. या प्रकरणी पुढील तपासासाठी एटीएसने आरोपीला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

🤙 8080365706