कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत; शरद पवार

कोल्हापूर : राज्यामधील सत्तासंघर्षात शिवसेनेत दोन गट पडले असले, तरी कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

शरद पवार कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल. मी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात फिरलो आहे, फिरत आहे, कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. येत्या निवडणुकीत जनताच सर्वांना जागा दाखवेल. त्यावेळी जनतेच्या भावना काय आहेत हे समजतील. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाहीत. परंतु, आमच्यात मतभेद सुरू असतील तर ते आम्ही बैठक घेवून सोडवू. असेही ते म्हणाले आहेत.

🤙 8080365706