कोल्हापूरात फळांचा राजा दाखल; मुहूर्ताच्या सौद्याला ५१ हजार रुपयांचा दर

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा शनिवारी दाखल झाला.कोल्हापूरकरांनी या हापूस आंब्यासाठी लावलेली बोली आजवरच्या इतिहासातील मोठी बोली ठरली. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला तब्बल 51 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सौद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच फळांचा राजा हापूस आंबा आज दाखल झाला. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यामध्ये पाच डझनाच्या पेटीला ५१,००० रुपयांचा दर निघाला. पहिला सौदा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढला.कोल्हापुरात साधरत: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आंब्याची आवक सुरू होते.मात्र यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये आंब्याची आवक सुरू झाली आहे. कुंभारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडिक यांनी बोली लावत ५१,००० खरेदी केला असून राज्यातील यावर्षीचा सर्वात उच्चांकी दर हा कोल्हापुरात मिळाला आहे.

🤙 8080365706