
मुंबई: भारत बायोटेक निर्मित जगातील पहिली इंट्रानेझल लस लवकरचं उपलब्ध होणार आहे. iNCOVACC ही प्राथमिक 2-डोस झाल्यानंतर बूस्टर डोस म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

कोरोनासाठीची जगातील पहिली नाकावाटे कोवीड लस म्हणून iNCOVACC उपलब्ध होणार आहे. ही लस खाजगी केंद्रावर ८०० रुपये आणि शासकीय केंद्रावर ३०० रुपयात उपलब्ध होणार आहे.
सुई-रहित लसीकरण म्हणून, भारत बायोटेकचा iNCOVACC हा भारतातील पहिला बूस्टर डोस आहे. iNCOVACC हा बूस्टर डोस असुन पहिले दोन प्राथमिक डोस घेणं गरजेचे आहे. १८ वर्षां पुढील नागरिकांसाठी iNCOVACC बूस्टर डोस म्हणुन वापरता येईल. iNCOVACC २-८°C वर स्टोरेज व वितरणासाठी योग्य आहे. भारत बायोटेकन निर्मित iNCOVACC गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणासह संपूर्ण भारतातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.